बॉलिवूड अभिनेत्री श्रीदेवी यांचं शनिवारी रात्री हृदयविकाराच्या धक्क्याने दुबईत निधन झाले. त्या ५४ वर्षांच्या होत्या.त्या आपल्या कुटुंबीयांसह दुबईत एका लग्न समारंभासाठी गेल्या होत्या. त्यावेळी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. त्यांनी अभिनयाची सुरुवात लहान असतानाच केली होती. त्यांनी १९७८ साली सोलहवाँ सावन या चित्रपटातून बॉलिवूड मध्ये पदार्पण केले. त्यानंतर त्यांनी अनेक चित्रपटांत काम केले आहे.बॉलिवूडमधील सदमा, नागिन, निगाहें, मिस्टर इंडिया, चालबाज, लम्हे, खुदा गावाह, जुदाई अशा अनेक गाजलेल्या चित्रपटां मधून त्यांनी भूमिका साकारल्या. याचबरोबर, त्यांनी तमीळ, तेलगू, मल्याळम, कन्नड चित्रपटांमध्ये सुद्धा काम केले. अभिनय क्षेत्रात उत्तम कामगिरी केल्याबद्दल श्रीदेवी यांना २०१३ साली भारत सरकारकडून पद्मश्री या पुरस्काराने गौरविण्यात आले होतं. या शिवाय त्यांना आतापर्यंत पाच फिल्मफेयर पुरस्कारही मिळाले आहेत.
आमच्या चैनल ला सब्सक्राइब करा https://www.youtube.com/LokmatNews